आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री पी. चिदंबरम करदात्यांना काही प्रमाणात दिलासा देऊ शकतात. गेल्या तीन वर्षांमध्ये कर वसुलीत चांगलीच सुधारणा दिसून आल्याने अर्थमंत्री यावर्षी करदात्यांना दिलासा देण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांना वाटते आहे. 2007-08 वर्षात करवसुली जबरदस्त झाल्याने चिदंबरम यांच्यावर करात सवलत देण्याचा मोठा दबाव आहे.