आशादायी रेल्वे अर्थसंकल्प-कॉग्रेस

वार्ता

मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (19:37 IST)
चालू वित्तवर्षासाठी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी सादर केलेला अर्थ संकल्प हा अत्यंत आशादायी असल्याचे मत कॉग्रेसने व्यक्त केले आहे.

लालू प्रसाद यांनी अत्यंत दूरगामी दृष्टिकोनातून हा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. कॉंगेस प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी लालू प्रसाद यादव यांचे या बद्दल अभिनंदन केले असून, समाजातील सर्व घटकांचा विचार या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा