इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक डॉ. यशवंत रायकर यांना जाऊन आज एक वर्ष झालं. पुरातत्त्व संशोधक, व्यासंगी वाचक, आणि बुद्धिवादी लेखक म्हणून त्यांचं योगदान हे मोलाचं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अथातो धर्मजिज्ञासा या पुस्तकाची निर्मिती केली.
Anokhi Publications तर्फे हे पुस्तक जानेवारी 2015मध्ये प्रकाशित झालं. पुस्तकसागरच्या वेबसाइट तसेच मोबाइल अॅपवरही हे पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या निर्मितीनंतर डॉ. रायकरांनी दुनिया दामू देवबाग्याची या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या संपादनाला हात घातला. पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा मी हयात नसेन असं ते म्हणायचे. आज त्यांच्या निधनानंतर बरोबर एक वर्षाने त्यांचं हे पुस्तक प्रकाशित होत आहे. आज पुस्तकसागरतर्फे डॉ. रायकर यांना आदरांजली वाहताना अनोखी पब्लिकेशन्सतर्फे दुनिया दामू देवबाग्याची, कहाणी एका शूद्राची हे पुस्तक नव्याने संपादित होऊन पुनर्प्रकाशित पुस्तक सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. पुस्तकसागरच्या वेबसाइटवर व मोबाइल अॅपवर हे पुस्तक ई-बुक तसेच प्रिंट ऑन डिमांड या स्वरूपातही उपलब्ध आहे.