Zee cine awards 2019 मध्ये दीपिका-रणवीर, रणबीर-आलियाने मन जिंकलं (बघा फोटो)
बुधवार, 20 मार्च 2019 (16:14 IST)
नुकत्याच पार पडलेल्या ‘झी सिने अॅवॉर्ड्स’मध्ये पद्मावत चित्रपटात उत्कृष्ट अभिनयासाठी दीपिका पादुकोणला बेस्ट एक्ट्रेस पुरस्कार तर संजू या चित्रपटात उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी रणबीर कपूरला बेस्ट एक्टर अवार्ड मिळाले. रणवीर सिंह कुठे मागे राहणार. त्याला देखील प्रेक्षकांच्या पसंतीवर बेस्ट एक्टर पुरस्कार देण्यात आला.
मुंबईत आयोजित झालेल्या या अवॉर्ड समारंभ कार्तिक आर्यन आणि विक्की कौशल दोघांनी होस्ट केले. या दरम्यान कलाकारांनी परफॉर्म देखील केले. दीपिका- रणवीर आणि रणबीर- आलिया यांच्या जोडीने तर कमालच केली.
या अवॉर्ड्स समारंभात पद्मावत चित्रपटाने सर्वाधिक चार अवॉर्ड पटकावले. बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार संजय लीला भंसाली आणि व्यूवर्स च्वायस अंतर्गत बेस्ट एक्टर अवॉर्ड रणवीर सिंहने जिंकला.
बेस्ट सपोर्टिंग एक्टर अवॉर्ड विक्की कौशलला संजू सिनेमासाठी तर या श्रेणीत फीमेल सेक्शनमध्ये कटरीना कॅफने सर्वांना मागे टाकत जिरो या चित्रपटासाठी पुरस्कार मिळविला. यावेळी एक्स्ट्राऑडनरी परफॉर्मर ऑफ द इयरसाठी आयुष्मान खुराना याला निवडण्यात आले. त्याचे अंधाधुन आणि बधाई हो दोन्ही सिनेमे सुपरहिट होते.
शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याला धडक आणि बियोंड द क्लाउडसाठी बेस्ट डेब्यू मेल आणि जाह्नवी कपूरला धडकसाठी बेस्ट डेब्यू फीमेल अवॉर्ड मिळाला. बेस्ट निगेटिव्ह रोलसाठी तब्बूला अंधाधुन या चित्रपटासाठी श्रेष्ठ मानले गेले तर सोनू के टीटू की स्वीटी यासाठी कार्तिक आर्यनला बेस्ट एक्टर इन कॉमिक रोल अवॉर्ड देण्यात आले.
प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना भारतीय सिने सृष्टीत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. एक्स्ट्राऑडनरी ऑयकॉन फॉर सोशल चेंजेससाठी सोनम कपूर सन्मानित झाली. गोल्ड सिनेमात ‘नैनो ने बाँधी ऐसी डोर’ गाण्याला आपली आवाज देणारे यासर देसाई आणि राजी सिनेमातील दिलबरों गाणारी गायिका हर्षदीप कौर-विभा सराफ हिला बेस्ट प्लेबॅक सिंगर अवॉर्ड देण्यात आले.
स्त्री चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिकला बेस्ट डेब्यू डायरेक्टर निवडले गेले आणि पद्मावतमध्ये घूमर डांसला बेस्ट कोरियोग्राफी अवार्ड मिळाले. स्त्री चित्रपटाचे डायलॉग श्रेष्ठ मानले गेले आणि यासाठी पंकज त्रिपाठीला पुरस्कृत करण्यात आले. शाहरुख खानचे चित्रपट जिरोला बेस्ट वीएफएक्स अवॉर्ड मिळाला.