एव्हरेस्टला पराभूत करणार्‍या पहिल्या अपंग महिलेच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट

सोमवार, 4 मार्च 2019 (19:00 IST)
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट यांचे शुभ काळ सुरु आहे असे म्हटलं तरी चालेल. अलीकडेच रिलीझ सिनेमा 'गली बॉय' हिट ठरला. त्याच वेळी, आलिया 'कलंक', 'ब्रह्मास्त्र' आणि 'सडक 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आणि  आता आलिया भट्टचं नाव आणखी एका चित्रपटात जोडले गेले आहे.
 
अहवालानुसार आलिया भट्ट लवकरच एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. आलिया एव्हरेस्टला पराभूत करणार्‍या पहिल्या अपंग भारतीय अरुणिमा सिन्हाच्या बायोपिकमध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 'बोर्न अगेन ऑन  द माउंटनः ए स्टोरी ऑफ लूझिंग एव्हरीथिंग अँड फाइंडिंग बॅक' नावाच्या पुस्तकवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
 
माउंट एव्हरेस्ट पराभूत करणार्‍या अरुणिमा सिन्हाने 1 एप्रिल 2013 रोजी एव्हरेस्टवर चढाई सुरु केली होती. 53 दिवसांच्या अत्यंत अवघड पर्वत चढाईनंतर अखेरीस, 21 मे रोजी, ती एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी जगातील  पहिली महिला अपंग माउंटनियर बनली. आलिया भट्टने या चित्रपटात काम करण्यासाठी संमती दिल्याचे कळून येत आहे. हा चित्रपट करण जौहर आणि विवेक रंगाचीरी प्रोड्यूस करणार असून यात अरुणिमाची भूमिका  बजावण्यासाठी आलियाला वजन वाढवायला सांगितले गेले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती