यश राज फिल्म्सची मर्दानी सीरीज ही हिंदी सिनेमातील सर्वात मोठी महिला-केंद्रित फ्रेंचायझी मानली जाते, जिला गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि प्रशंसा दिली आहे. ही ब्लॉकबस्टर फ्रेंचायझी आता एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखली जाते आणि सिनेप्रेमींमध्ये विशेष स्थान मिळवले आहे.
YRF ने आज जाहीर केले की मर्दानी 3 , 27 फेब्रुवारी 2026, शुक्रवार रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच आठवड्यात 4 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे निर्माते हा चित्रपट रक्तरंजित व प्रचंड हिंसक संघर्ष म्हणून सादर करत आहेत – शिवानीच्या निखळ चांगुलपणाचा सामना होणार आहे अत्यंत क्रूर वाईट शक्तींशी.