सोनू सूदने नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने राजकीय पदार्पणाबाबत भाष्य केलं. राजकारणात पदार्पण करण्याबाबत सोनूला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सोनूने उपमुख्यमंत्री व खासदार पदासाठी ऑफर मिळाल्याचा खुलासा केला आहे. सोनू म्हणाला, “राजकीय पदार्पणाबाबत बोलायचं झालं तर मला राज्यसभेचा खासदार होण्याची ऑफर मिळाली होती. पण मी ती नाकारली”.
“याबरोबरच मला अजून काही पदांच्याही ऑफर मिळाल्या होत्या. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री पदाचीही ऑफर मला देण्यात आली होती”, असंही सोनू सूद म्हणाला. “मला खूप गोष्टींची ऑफर मिळाली आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे मला उत्साह मिळत नाही. मी स्वत: माझ्यासाठी नियम बनवतो. कारण, कोणीतरी बनवलेल्या रस्त्यावर चालायला मला आवडत नाही”, असंही सोनू सूदने सांगितलं.