जिया खान कोण होती तिने आत्महत्या का केली , सूरज पांचोलीवर हत्येचा आरोप जाणून घ्या पूर्ण प्रकरण ?

शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (12:20 IST)
नफीसा खान उर्फ जिया खान (फेब्रुवारी २०, इ.स. १९८८ - जून ३, इ.स. २०१३) ही एक ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री होती. तिने २००७ साली निःशब्द ह्या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००८ सालच्या गजनीमध्ये देखील तिने काम केले होते.
 
जिया खान ३ जून २०१३ रोजी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. आत्महत्येनंतर तिच्या घरातून सहा पानी सुसाइड नोट सापडली होती जी जिया खाननेच लिहिल्याचा दावा करण्यात आला होता.
 
सुरुवातीला या प्रकरणाकडे आत्महत्या म्हणून दुर्लक्ष करण्यात येत होते, पण नंतर जियाच्या आईने मुलीच्या प्रियकर सूरज पांचोलीवर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर कोर्टानेही सूरजला जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
 
जिया आणि सूरजची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती. मग हळूहळू दोघेही एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
 
जियाने जेव्हा तिची आई राबिया हिला सूरजबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले तेव्हा तिच्या आईला फारसा आनंद झाला नाही. मात्र, त्यांनी या यावर काही आक्षेपही घेतला नाही, कारण त्यांना आपल्या मुलीला आनंदात बघायचे होते.

जियाने आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने तिला असे काही मेसेज पाठवले होते, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरजने जियाला १० मेसेज पाठवले होते, ज्यांची भाषा खूपच वाईट आणि अभद्र होती.
 
जिया ३ जून २०१३ रोजी तिच्या जुहू येथील घरी मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या कथित सुसाइड नोटमध्ये असे लिहिले होते की, सूरजने तिची फसवणूक केली. नंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आले. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. यानंतर १० जून रोजी सूरजला अटक करण्यात आलेली. दोन आठवड्यांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानंतर सूरजची जामिनावर सुटका करण्यात आली. जुलै २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.
 
सूरजवर या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले गेले. त्याच्यावर जियाच्या आईने असा आरोप केलेला की सूरजने जियाला गर्भपात करण्यात प्रवृत्त केले. राबिया यांच्या मते त्यांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणात सूरज मुख्य गुन्हेगार आहे आणि त्यांनी जियाच्या हत्येचा आरोपही त्याच्यावर केला आहे. मात्र सूरज आणि त्याचे सेलिब्रिटी पालक अर्थात जरीना वहाब आणि आदित्य पांचोली यांनी आपला मुलगा जियाच्या मृत्यूला जबाबदार नसल्याचेच सुरुवातीपासून ठामपणे सांगितले आहे.
 
माझा मुलगा निरपराध
निकाल येण्यापूर्वी सूरजची आई जरीना अजून धक्क्यातच आहे. त्यांनी असे म्हटले की, 'आम्ही १० वर्षे निकालाची वाट पाहिली. आमच्या मुलासाठी ही गोष्ट नरक बनली आहे. असे असूनही आम्हाला विश्वास आहे की आमच्या मुलाला न्याय मिळेल. जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे पाहतो तेव्हा मला त्याच्या वेदना जाणवतात. मी त्याच्या डोळ्यात पाहू शकत नाही. तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे हे मी अनुभवू शकतो. मला असहाय्य वाटते. माझा मुलगा निर्दोष आहे हे मला माहीत आहे. या गोष्टीला १० वर्षे झाली, पण माझा या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे.' त्यांनी देवावर विश्वास दाखवत सूरज निर्दोष सुटेल असा विश्वास व्यक्त केला.
 
फेसबुकवर झालेली भेट
जिया अवघ्या १८ वर्षांची होती जेव्हा तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'निशब्द'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असेल, परंतु अभिनेत्रीने खूप प्रसिद्धी मिळवली. त्याचवेळी सूरजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नव्हते. तो फक्त स्टारकीड होता आणि काम मिळवण्यासाठी धडपडत होता. मीडिया रिपोर्टनुसार, जिया आणि सूरजची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती.
 
आत्महत्येच्या दिवशी जियाने सूरजला अनेकवेळा फोन केला, पण त्याने जियाशी बोलायचं टाळलं. जियाने तिच्या पात्रात सुरज पंचोलीबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. त्याने केवळ जियाला दुख यातनाच दिल्या असल्याचंही जियाने त्या पत्रात लिहिलं होतं. नंतर या पत्रावरूनच प्रचंड गहजब झाला होता.
 
जिया खानची कारकीर्द जास्त मोठी नव्हती. राम गोपाल वर्मा यांच्या ‘निशब्द’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेवती मुख्य भूमिकेत होते. जियाने नंतर ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ सारख्या चित्रपटातही काम केले आहे.
 


Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती