लता मंगेशकरांनी एकदा या घटनेचा उल्लेख अशा प्रकारे केला होता, 'बॉम्बे टॉकीज' चित्रपटाच्या 'जिद्दी'च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी त्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना, त्याच ट्रेनमध्ये एक माणूसही प्रवास करत असल्याचं त्यांना दिसायचं. नंतर स्टुडिओत जाण्यासाठी त्या टांगा घेऊन जाताना ती व्यक्तीही त्याच दिशेने टांगा घेऊन येताना दिसत.