OMG 2 Trailer अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या देव आणि भक्त यांच्या नात्यावर आधारित 'OMG 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी झटत होते. ट्रेलरची आतुरतेने वाट पाहिली जात होती. चित्रपटात अक्षय कुमार शिवाचा संदेशवाहक तर पंकज त्रिपाठी भक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे.
OMG 2 चित्रपटाची कथा कांती शरण मुद्गल म्हणजेच पंकज त्रिपाठी या सामान्य माणसाच्या जीवनाभोवती फिरते. कांतीची भगवान शंकरावर पूर्ण श्रद्धा आहे. मुलासाठी कांती देशाच्या शिक्षण व्यवस्थेला कोर्टात घेऊन जातो. आपल्या मुलासाठी कांती देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा सामना करताना दिसत आहे. या लढ्यात अक्षय कुमार शिवाचा दूत म्हणून त्याच्यासोबत आहे.
हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे
हा चित्रपट 2012 च्या हिट चित्रपट 'ओएमजी - ओह माय गॉड' चा सिक्वेल आहे ज्यात अक्षय आणि परेश रावल यांनी अभिनय केला होता. तब्बल 11 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 सोबत टक्कर होणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त 'OMG 2' मध्ये यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.