राजकारणात प्रवेश करण्याबाबत सोनू सूद काय म्हणाले?

मंगळवार, 25 जानेवारी 2022 (10:16 IST)
कोरोना आरोग्य संकटात अभिनेता सोनू सूद चर्चेत आले. ते गरजूंना सातत्याने मदत करत असल्याचं चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं.
 
बहीण मालविका सिंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनू सूदही राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला जात होता.

मालविका सिंग या पंजाब निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून मोगा या मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. बहिणीच्या प्रचारासाठी सोनू सूदही मैदानात उतरले आहेत.
 
आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून आपण केवळ बहिणीला प्रचारासाठी मदत करत असल्याचं सोनू सूद यांनी स्पष्ट केलं आहे.
 
"माझा राजकारणाशी संबंध नाही हे मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे. मी आजही अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ताच आहे. मला अनेक पक्षांकडून ऑफर्स आल्या. राज्यसभेसाठीही विचारणा झाली. पण माझ्या हातात आधीच खूप काम आहे आणि माझी टीम एवढी मोठी नाही." असं सोनू सूद यांनी स्पष्ट केलं. आजपासून पाच ते सात वर्षांनंतर विचार करता येईल असंही ते म्हणाले
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती