हा अभिनेता गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांशी झुंज देत होता. सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. वृत्तानुसार, अभिनेत्याचे अंतिम संस्कार उद्या, 24 डिसेंबर रोजी महाप्रस्थानम येथे होणार आहेत.
वामशी आणि शेखर यांनी ट्विटर हँडलवरून अभिनेता कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते लिहितात, 'ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण गरू यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. कैकला सत्यनारायण यांनी आज सकाळी हैदराबादमधील फिल्म नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या वर्षीही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अभिनेत्याला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 87 वर्षीय कैकला दीर्घकाळापासून वयोमानाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. या अभिनेत्याच्या निधनावर दक्षिण भारतीय चित्रपटांतील बड्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.