मुंगडा गाण्याचे रिमिक्स उषा मंगेशकर कमालीच्या नाराज

सत्तरच्या दक्षकात गाजलेले ‘मुंगडा’ हे गाणे तुफान गाजले तर ते आजही लोकांना तितकेच प्रिय आहे. मात्र  या गाण्याचे आता रिमिक्स नुकतेच प्रदर्शित झाले असून, गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नाचतांना चित्रित झाले आहे.  गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याच्या गायिका उषा मंगेशकर यांनी या रिमिक्सवर आक्षेप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

पिंक व्हिला या वेबसाइटने असा दावा केला असून, उषा मंगेशकर या सोनाक्षी सिन्हावर नाराज असल्याची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली गेली आहे. आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ या चित्रपटासाठी ‘मुंगडा’ गाण्याचे रिमिक्स तयार केले आहे. २२ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उषा मंगेशकर यांनी १९७७ साली हे गाणे गायले होते. या गाण्यात हेलन यांनी डान्स केला होता. त्यावेळी नाही तर आजही हे गाणे लोकांमध्ये प्रिय आहे. उषा मंगेशकर म्हणतात की आम्ही त्यावेळी खूप मेहनत करत हे गाणे बसवले होते त्यामागे फार कष्ट आणि परिश्रम होता त्यामुळे या गाण्याचे रिमिक्स बनवणे चुकीचे आहे. माझा याला विरोध आहे.

सध्या बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपट येत असून जुनी हिट गाणी थोडे संगीत बदलून आणि संगीत टाकून बदलून पुन्हा प्रसिद्ध केली जात आहे. तम्मा तम्मा लोगे, आख मारे लाडका आख मारे अशी गाणी नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती