उर्वशी रौतेलाला मोठे यश मिळाले आहे. ग्लॅमर जगप्रसिद्ध इ-वेबसाइट टाईम्स पेजंट्सने तिला जगातील पहिल्या दहा सेक्सीएस्ट सुपर मॉडेलच्या यादीत स्थान दिले आहे. यात इरिना शायक, सारा पिंटो संपाओ अशी सुपर मॉडेल्स आहेत.
उर्वशीचे कौतुक करत म्हटले आहे की ती मिस टीन इंडिया, मिस एशियन सुपरमॉडल इंडिया, इंडियन प्रिन्सेस, मिस क्वीन ऑफ दी इयर इंटरनॅशनल इंडिया, मिस टूरिझम क्वीन ऑफ द इयर इंटरनॅशनल वर्ल्ड अशी अनेक पदके जिंकणारी मॉडेल असल्याचे म्हटले जाते.