एका मुलाखतीदरम्यान विवियन डिसेनाने सांगितले होते की, इजिप्शियन नूरन अली पेशाने पत्रकार आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी नूरनने तिला मुलाखतीसाठी संपर्क साधला होता, त्यानंतर अभिनेत्याने तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तिला मुलाखत दिली होती. त्याचवेळी विवियनने सांगितले होते की, पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. भिनेत्याने त्याच्या लग्नाच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.त्याला त्याचे लग्न गुप्त ठेवायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर हे जोडपे मुंबईतील लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत.