सलमानच्या घरी गोळी झाडणाऱ्यांना अटक

मंगळवार, 16 एप्रिल 2024 (11:10 IST)
दोन दिवसांपासून पोलीस सलमानखानच्या गॅलक्सी इमारतीवर केलेल्या गोळीबाराच्या आरोपीचा शोध घेत होते. त्यानंतर मुमबी पोलिसांनी दोघांना गुजरातमधील भुज मधून अटक केली आहे. तसेच दोन दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या मागावर होते व आता या आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
 
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी घरावर रविवारी गोळीबार झाला होता. तसेच मुंबई पोलिसांना हा गोळीबार करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे. तसेच हे आरोपी गोळीबार करून मुंबईमधून पळून गेले होते पण मुमबी पोलिसांनी त्यांना शोधून काढून त्यांना गुजरातमधील भुज येथे अटक केली आहे. 
 
तसेच या दोघ आरोपींना आता मुंबईला आणण्यात येत आहे, व आज दुपारी मुंबईमधील किल्ला कोर्टात त्यांना हजर केले जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींमधून विदेशी बनावटीच्या पिस्तूल ज्या त्यांनी गोळीबाराची वापरल्या होत्या, तसेच जिवंत काडतुसे, रोख रक्कम, मोबाईल इत्यादी वस्तू जप्त केल्या गेल्या आहे. या दोघांनीच सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत  दिली आहे.
 
तसेच झालेल्या गोळीबाराचे फुटेज मिळाले असून यामध्ये दिसले आहे की, या आरोपींनी रविवारी पहाटेच्या सुमारास गॅलॅक्सीवर गोळीबार करून दुचाकीवर बसून निघून गेलेत. त्यांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या त्यापैकी एक गोळी घराच्या खिडकीला लागली तर दोन गोळ्या भिंतीला लागल्या तर बाल्कनीला एक गोळी लागली असून तर एका गोळीचे कवच हे घरात मिळाले. यामुळे सलमान खानच्या घरावरील सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांच्याशी सवांद साधला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या हल्ल्या संदर्भात तपास सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती