प्रभासच्या बहुचर्चित 'सालार' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
शुक्रवार, 7 जुलै 2023 (21:10 IST)
बाहुबली फेम प्रभासचा नुकताच प्रदर्शित झालेला आदिपुरुषला प्रेक्षकांनी जोरदार ट्रोल केले असल्याने या चित्रपटाची बिग बजेट आणि व्हीएफएक्स असूनही जादू चालली नाही.
बाहूबलीची कामगिरी सोडल्यास प्रभासचा राधेशाम, आदिपुरुष, साहो असे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले असल्याने त्याचा येणारा नवा चित्रपट ‘सालार’कडून प्रचंड अपेक्षा आहे. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सालारचे दिग्दर्शन केले आहे.
ज्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी प्रभासचे व दिग्दर्शक नीलचे कौतूक केले आहे. सालारचा टीझर केजीएफ २ चा पुढील भाग म्हटले जात आहे. तर अनेकांना हा चित्रपट केजीएफचा क्रॉस ओव्हर असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. २८ सप्टेंबर रोजी प्रभासचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.