आदिपुरुष या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या चित्रपटात प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे, कृती सेनॉन सीतेची भूमिका साकारणार आहे, तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरला आणि चित्रपटातील सर्व गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच आता या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना नवीन सरप्राइज दिलं आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.