शाहरुखसाठी नवीन वर्ष ठरलं फायद्याच

शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (11:41 IST)
डिसेंबर २०२३ च्या अंती प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा चित्रपट डंकी २०२४ मध्ये दिमाखात दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारीमध्ये चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे. शाहरुखचा हा चित्रपट देशात २०० कोटींचा आकडा गाठण्यासाठी वेगाने पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

प्रभासचा ‘सालार’ डंकीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला. सालार २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून बंपर कमाई करत आहे. ‘सालार’च्या तुलनेत डंकीची कमाई संथ होती पण चित्रपटाचे कलेक्शन तितकेसे वाईट नव्हते. पण आता चित्रपटाला नवीन वर्षाचा लाभ मिळ्याल्याचे दिसते. चित्रपटाने वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा सोमवार, १ जानेवारी २०२४ रोजी किती कमाई केली ते जाणून घेऊ.

हा चित्रपट रिलीज होण्याआधीच ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या कमाईचा आकडा ओलांडणार असे बोलले जात होते मात्र तसे झाले नाही. त्याची ओपनिंग सर्वात कमी २९.२ कोटी झाली, आता या सिनेमाची कमाई भारतात २०० कोटींच्या जवळ पोहोचली आहे. एका अहवालानुसार, चित्रपटाने २०२४ च्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ व्या दिवशी दुसऱ्या सोमवारी ९.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण १२ दिवसांत चित्रपटाने १९६.९७ कोटींची कमाई केली
आहे.
 
डंकीची जगभरात ३८० कोटींची कमाई
डंकीच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास ३८० कोटींचा गल्ला गाठला आहे. या चित्रपटाने ११ दिवसांत ३७०.२५ कोटी रुपये कमावले आहेत, तर ११ दिवसांत केवळ विदेशात १४५.०० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने इतक्या दिवसात २२५.२५ कोटी रुपयांचे कमाई केली आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती