कोबराबरोबरचा व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (09:11 IST)
छोट्या पडद्यावरील मालिका 'नागार्जुन एक योध्दा'मधील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर श्रुतीचा कोबरा सापाबरोबरचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रुती उल्फतसह चार जणांना अटक केले आहे. वन्य जीव अधिनियमाचे उलंघन केल्याच्या आरोपाखाली या चार जणांना अटक कऱण्यात आली आहे. वन विभागाने सोशल मीडियावरील तो व्हिडिओ डाऊनलोड करुन कलिना येथिल फॉरेंसिक लॅबला परिक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाला त्यामध्ये व्हिडिओ मध्ये जिंवत साप वापरण्यात आल्याचे दिसून आले. काल चारही जणांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा