मागच्या नऊ वर्षात टप्पूच्या खोडकरपणातून निर्माण झालेल्या वादांनी प्रेक्षकांना भरभरुन हसवले. मालिका सुरु झाली तेव्हा शाळेत जाणारा टप्पू आता कॉलेज कुमार झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. भारतात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहून आपली संस्कृती जपतात तसेच या मालिकेत दाखवण्यात आले. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष भावली. निखळ विनोदातून सामाजिक संदेश हे या मालिकेचे आणखी एक वैशिष्टय आहे. त्यामुळे या मालिकेचा एक प्रेक्षकवर्ग आहे.