दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले
सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (11:52 IST)
सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. बिहार पोलिसांनी सुशांतची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येची चौकशी करत आहे. त्यासाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूच्या फाईल संदर्भात माहिती घेण्यासाठी पोहोचले.
मात्र, दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं सांगण्यात आलं. दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवणं अशक्य असल्याचं बिहाप पोलिसांना सांगण्यात आलं.
शिवाय पोलीस याप्रकरणातील सर्व माहिती सांगण्यासाठी तयार होते. बिहार पोलिसांनी फोल्डर पुन्हा मिळवण्यासाठी मदतही केली. पण त्यांना लॅपटॉप देण्यास नकार देण्यात आला.