‘स्टार प्लस दोपहर’नवीन विभाग सुरू

बुधवार, 1 मार्च 2017 (11:05 IST)
स्टार प्लस’ वाहिनीवर सध्या ‘प्राइम टाइम’ मालिका रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू असतात. पुढे या मालिका दिवसभरात दोनदा प्रक्षेपित केल्या जातात. प्रेक्षकांनाही याची सवय असल्याने रात्रीच्या वेळेचा एखादा भाग पाहता नाही आला तरी, दुसऱ्या दिवशी त्यांना तो पाहता येतो. मात्र, दुपारी आदल्या दिवशीच्या मालिकेचा शिळा भाग पाहण्याची प्रेक्षकांची सवय मोडून काढण्याचा निर्णय ‘स्टार प्लस’ने घेतला आहे.
 
‘स्टार प्लस दोपहर’ हा नवीन विभाग त्यांनी सुरू केला असून  टेलिव्हिजनवर लोकप्रिय असलेल्या मालिकांचे लेखक आणि निर्मिती संस्था यांच्या मदतीने दुपारच्या वेळेत चार नवीन मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दाखल होणार आहेत. ‘स्टार दोपहर’अंतर्गत ‘दिया और बाती हम’ या ‘स्टार प्लस’च्या गाजलेल्या मालिकेचा सिक्वल ‘तू सूरज मैं साँझ, पियाजी’ नावाने येणार आहे. त्यापाठोपाठ ‘फातेमागुल’ या तुर्की मालिकेचा देशी अवतार ‘क्या कसूर है अमला का’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, देवाविषयी कुठलीही आस्था न बाळगणाऱ्या तरुणीची कथा ‘एक आस्था ऐसी भी’ या नावाने तर दोन ‘वजनदार’ प्रेमी जीवांची कथा ‘ढाई किलो प्रेम’ नावाने दिसणार आहे.

वेबदुनिया वर वाचा