मैं सिकंदर हूं' गाण्याच्या लेखकालाही मारण्याचा इशारा दिला. या संदेशांनंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा सक्रिय झाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रायचूरमधील मोबाईल क्रमांकाचा माग काढला ज्यावरून हे संदेश आले होते. त्यानुसार एक पथक कर्नाटकात पाठवण्यात आले असून क्रमांकाचा मालक व्यंकटेश नारायण याची चौकशी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र नारायणच्या मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधा नव्हती. त्याच्या फोनवर व्हॉट्सॲप इन्स्टॉलेशनचा ओटीपी आल्याचे पोलिसांना आढळले. नारायणने पोलिसांना सांगितले की, 3 नोव्हेंबर रोजी एक अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ बाजारात आला आणि त्याने फोन करण्यासाठी नारायणचा फोन वापरु शकतो का असे विचारले.
अधिकाऱ्याने सांगितले की, नारायणचा मोबाइल नंबर वापरून ओटीपी प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीने त्याच्या मोबाइलवर व्हॉट्सॲप इन्स्टॉल केले होते, असे तपासात समोर आले आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पाशाला रायचूरजवळील मानवी गावात पकडले. धमकीमध्ये नमूद केलेल्या "मैं सिकंदर हूं" या गाण्याचा तो लेखक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने सांगितले की, त्याला हे गाणे प्रसिद्ध करायचे आहे आणि म्हणून त्याने एका प्रसिद्ध व्यक्तीला दिलेल्या धमकीच्या संदेशात ते समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला.आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहे.