बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगमला कोणत्याही ओळखीची गरज नाही. गायनाव्यतिरिक्त, गायक त्याच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी देखील ओळखला जातो. अलीकडेच त्यांनी काही बड्या गायकांना पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याबद्दल एक व्हिडिओ शेअर करून आवाज उठवला. दरम्यान, आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
सोनू निगम ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मध्ये त्यांनी घडलेले सांगितले आहे. ते म्हणतात माझ्या आयुष्यातील सर्वात कठिन दिवस होता.मी गाणे गात असताना नाचत असताना दुखणे सुरु झाले. मी कसेबसे स्वता:ला सावरले.मला लोकांच्या अपेक्षा मोडायच्या नव्हत्या.म्हणून मी कॉन्सर्ट पूर्ण केला.
पण वेदना असहनीय होती. असे वाटत होते की कोणी माझ्या मणक्यात सुई टोचली आहे.
व्हिडिओच्या खाली गायकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'काल रात्री सरस्वतीजींनी माझा हात धरला.' आता त्याचे चाहते या व्हिडिओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.