पाकिस्तानात राहण्यास इच्छुक आलिया भट्टची आई, म्हणे तिथे जास्त आनंदी राहीन

आलिया भट्टची आई सोनी राजदान प्रत्येक प्रकरणावर आपलं मत अगदी न घाबरता देते. लवकरच सोनी 'नो फादर्स इन काश्मीर' चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सोनी राजदानने दिलेले वक्तव्य चर्चेला विषय ठरलं आहे.
 
सोनी राजदानने म्हटले की मी काही बोलले की ट्रोल होते. मला देशद्रोही म्हटलं जातं. कधी-कधी वाटतं की मला पाकिस्तान निघून जायला हवं. मी तिथे अधिक आनंदात राहीन. तेथील जेवण देखील खूप छान आहे. आपण लोकांनीच मला ट्रोल करून म्हटले की पाकिस्तान जा, म्हणून पाकिस्तान जाईन.' 
 
सोनीने म्हटले की 'मी स्वत:च्या इच्छेने पाकिस्तानात सुट्टा घालवीन.' सोनी हे देखील म्हणाली की तिच्यावर ट्रोलर्सद्वारे पाकिस्तान पाठवण्याच्या कमेंट्सचा अधिक प्रभाव पडलेला नाही. सोनीने म्हटले की 'मी भारताला पूर्णपणे हिंदू देश बनवण्याच्या विरोधात आ हे. पाकिस्तानमध्ये मिश्रित संस्कृती नाही म्हणून तो चांगला देश बनू शकला नाही.' 
 
सोनी राजदानचा सिनेमा No Fathers in Kashmir 5 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. यात अश्विन कुमार, अंशुमान झा आणि कुलभूषण खरबंदा सारखे मोठे कलाकार आहेत. यात एका ब्रिटिश भारतीय नूर ची कहाणी दर्शवली गेली आहे. नूर आपल्या बेपत्ता वडिलांना शोधण्यासाठी काश्मीर येतो. तेथे माजिदशी मैत्री करतो आणि तो त्याला आपल्या वडिलांना शोधण्यास मदत करतो.
 
फिल्मची टॅगलाइन आहे 'प्रत्येक जण विचार करतं की त्याला काश्मीरबद्दल माहीत आहे परंतू चित्रपट काश्मिरी लोकांची वास्तविकता आणि त्याची खरी कहाणी दाखवण्याचा प्रयत्न करते. 
 
या चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विन कुमार पूर्वी दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकून चुकले आहेत. फिल्म 'नो फादर्स इन काश्मीर' ला 8 महिन्यानंतर यूए सर्टिफिकेट दिले गेले आहे. सेंसर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जुलै 2018 मध्ये पहिल्यांदा फिल्म फाइल केली गेली होती. आपल्या चित्रपटाला न्याया दिलवण्यासाठी दिग्दर्शक आणि कलाकारांना 8 महिने, सहा स्क्रीनिंग्स आणि सात सुनावणी पर्यंत वाट बघावी लागली. आता सिनेमा रिलीजसाठी तयार आहे.

फोटो: सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती