प्रियंका चोप्रा 50 मोस्ट पॉवरफुल महिलांच्या यादीत सामील

जगभरात आपले नाव पसरवणारी देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या नावाशी एक नवीन यश आले आहे. नुकतेच प्रियंका चोप्राला यूएसए टुडेच्या पॉवर आयकॉन यादीत सामील केले गेले आहे. या यादीत मनोरंजन जगाच्या 50 सर्वात शक्तिशाली महिला समाविष्ट केल्या जातात.
 
प्रियंका चोप्राने तीन वेळा ऑस्कर विजेता मेरिल स्ट्रीप, ओपरा विनफ्रे, बेयॉन्से, जेनिफर लॉरेन्स, अॅलन डीजेनेरेस आणि निकोल किडमॅन समेत इतर आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांसह या यादीत स्थान मिळविले आहे. आपल्या या उपलब्धतेबद्दल प्रियंका चोप्रा म्हणाली की माझ्यासाठी हे यश उर्जा प्रदान करणारे आहे. ही आपल्याला आपले इच्छित कार्य करण्यास प्रेरित करते. मला स्वतःचा अभिमान वाटत आहे कारण की आज मी त्या महिलांसह उभी आहे ज्या स्वतःच्या पाया उभ्या राहण्यासाठी आव्हानाला सामोर गेल्या आणि आज आपल्या करियरमध्ये सर्वोत्तम टप्प्यावर आहे. 
 
हे पहिल्यांदाच नाही जेव्हा कोणत्याही पॉवर लिस्टमध्ये प्रियंका समाविष्ट केली गेली आहे. या पूर्वी 2018 मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रियंकाला सामील केलं होत. 2017 मध्ये मोस्ट 500 इनफ्लुएंशियल पीपल इन एंटरटेंमेंट यादेत देखील तिला सामील केले होते. 
 
प्रियंका चोप्रा द स्काय इज पिंक या चित्रपटातून तीन वर्षानंतर बॉलीवूडकडे परत येत आहे. प्रियंकाने अमेरिकन टेलिव्हिजन ड्रामा शृंखला क्वांटिको मध्ये अॅलेक्स पॅरीशची भूमिका बजावून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त केली आहे. 2017 मध्ये तिनी ऍक्शन-कॉमेडी बेवॉचमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती