सलमान खानला तीनदा साप चावला
एएनआयशी झालेल्या संवादात सलमान खानने सांगितले की, माझ्या खोलीत एक साप आला होता, जो पाहून मुले घाबरली, म्हणून मी त्याला काठीने बाहेर काढत होतो. तो काठीच्या मदतीने माझ्या हातावर चढला. त्यानंतर मी त्याला सोडवण्यासाठी दुसऱ्या हाताने पकडले. आमच्या कर्मचार्यांनी जेव्हा साप पाहिला तेव्हा त्यांना वाटले की तो विषारी आहे. त्यानंतर सापाने मला एकदा नव्हे तर तीनदा चावा घेतला.
शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सलमानला तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सलमानने पुढे सांगितले की, त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आम्ही साप देखील सोबत घेऊन गेलो, तिथे आम्हाला समजले की तो विषारी नाही. तरीही मी 6 तास हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मला अँटी व्हेनमचे इंजेक्शन देण्यात आले. मी आता ठीक आहे.
सलमान खानने सांगितले की मला बरे वाटत आहे आणि त्याने सापाला मारले नाही. मी परत आल्यावर आम्ही सापाला जाऊ दिले. माझी बहीण खूप घाबरली होती म्हणून मी तिच्यासाठी सापासोबत फोटो क्लिक केला. सापाशी मैत्री केली. त्यानंतर सलमान म्हणाला की, माझ्या बाबांनी विचारले काय झाले? साप जिवंत आहे का? म्हणून मी म्हणालो टायगर जिंदा है, साप भी जिंदा है.