श्रुती हसनला नागा चैतन्यशी लग्न करायचे होते, बहिणीमुळे ते विभक्त झाले

शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (11:07 IST)
साऊथचा सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची मुलगी श्रुती हसन आज म्हणजेच 28 जानेवारीला तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1986 मध्ये जन्मलेली अभिनेत्री श्रुती हासनने टॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने आपले स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत  'गब्बर इज बॅक', जॉन अब्राहमसोबत 'वेलकम बॅक' सारख्या सिनेमांमध्ये काम केले. 
 
श्रुती हासन तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः लव्ह लाईफबद्दल देखील खूप चर्चेत आहे. एक काळ असा होता की कमल हसनची मुलगी श्रुतीला सामंथाचा माजी पती नागा चैतन्यसोबत लग्न करायचे होते.   
 
2013 मध्ये एका अवॉर्ड शोदरम्यान श्रुती आणि नागा चैतन्य जवळ आल्याने अफवांना उधाण आले होते. असे म्हटले जाते की दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते, परंतु त्यापूर्वीच त्यांचे मार्ग वेगळे झाले.या दोघांच्या विभक्त होण्यामागे श्रुतीची बहीण अक्षराचा हात असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती