शाहरुख खानने केली 25 हजार PPE किट्सची मदत, आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार

मंगळवार, 14 एप्रिल 2020 (10:07 IST)
करोना व्हायरसला लढा देण्यासाठी देशातील सर्व एकत्र आले असून प्रत्येकजण जमेल तेवढी मदत करत आहेत. अशात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने महाराष्ट्रातील डॉक्टर्स आणि नर्सेससाठी 25 हजार पीपीई किट्सचे वाटप केले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत शाहरुखच्या या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत.
 
शाहरुख खान यांनी 25 हजार पीपीई कीट देऊन केलेली मदतीसाठी त्यांचे मनापासून आभार. करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यामध्ये याची आम्हाला मदत होईल आणि मेडिकल टीमच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाईल, असं ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. यावर शाहरुखनेही त्यांचे आभार मानले आणि ही वेळ मानवजातीच्या सुरक्षेसाठी सर्वजण एकत्र येऊन लढा देण्याची असल्याचे म्हटलं. त्याने म्हटले की मदत करणे आमचे कर्तव्य आहे. आपलं कुटंब आणि टीम सुरक्षित आणि स्वस्थ राहो, अशी कामना केली आहे. 
 
या व्यतिरिक्त शाहरुखने वांद्रे येथील त्याची चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी दिली आहे. ‍शिवाय त्याने आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX डून सात संस्थांना निधी देत असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती