शाहरुख खानची मुंबई विमानतळावर तब्बल १ तास चौकशी

शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (21:15 IST)
शाहरुख खानची मुंबईविमानतळावर तब्बल १ तास चौकशी करण्यात आली आहे. शाहरुखसह त्याची मॅनेजर पूजा दललानी हिलाही कस्टम विभागाने अनेक प्रश्न विचारले. शुक्रवारी रात्री शाहरुख त्याच्या टीमसह मुंबई विमान तळावर पोहोचला होता. त्यावेळी, कस्टम विभागाने शाहरुखसह त्याच्या टीमला चौकशीसाठी थांबवले होते. १ तासाच्या चौकशीनंतर शाहरुख आणि पूजा हे विमानतळावरुन निघून गेले. मात्र, कस्टमने शाहरुखचा बॉडीगार्ड रवि आणि टीमला थांबवून घेतले होते. शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली. कस्टम विभागाच्या चौकशी आणि कारवाईत शाहरुखने सहकार्य केल्याचे समोर आले आहे.
 
शाहरुखने लाखो रुपयांच्या किंमतीची घड्याळे मुंबईला आणली आहेत. तसेच, शाहरुखच्या बॅगेत घड्याळाचे रिकामे डब्बेही दिसून आले. त्यामुळे, कस्टम ड्युटी भरली नसल्याच्या संशयावरुन विमानतळावर कस्टम विभागाने शाहरुखला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शाहरुख आपल्या प्रायव्हेट चार्टर VTR - SG ने दुबईतील एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी गेला होता. त्याच विमानाने शाहरुख शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता मुंबई विमानतळावर परतला. यावेळी, कस्टम विभागाला शाहरुख आणि त्याच्या टीमजवळ लाखो रुपयांच्या किंमतीची घड्याळे दिसून आली. तसेच, घड्याळांचे रिकामे बॉक्सही दिसून आले.
 
Edited by - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती