बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मुंबईतील खार येथील पाली हिल परिसरात दोन आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला या अपार्टमेंटसाठी तीन वर्षांसाठी 8.67 कोटी रुपये भाडे द्यावे लागेल.
वृतानुसार, शाहरुख खानने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आणि त्याची बहीण दीपशिखा यांच्याकडून एक डुप्लेक्स भाड्याने घेतला आहे . तर, शाहरुख खानने चित्रपट निर्माते वाशु भगनानी यांच्याकडून दुसरा डुप्लेक्स घेतला आहे.
अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी यांच्या मालमत्तेचे भाडे 11.54 लाख रुपये आहे. त्याच वेळी, वासू भगनानी यांच्या अपार्टमेंटचे भाडे दरमहा 12.61 लाख रुपये असेल. दोन्ही डुप्लेक्स पूजा कासा नावाच्या इमारतीत आहेत आणि पहिल्या, दुसऱ्या, सातव्या आणि आठव्या मजल्यावर आहेत.
खान कुटुंब त्यांचे घर आणखी भव्य बनवण्याची योजना आखत आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर गौरी खान यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडे अधिकृत अर्ज सादर केला होता. यामध्ये, वर दोन अतिरिक्त मजले बांधण्याची परवानगी मागितली आहे. 10 आणि 11 डिसेंबर रोजी बैठक घेऊन या अर्जाची पुनरावलोकन करण्यात आली.
शाहरुख खानचे घर सध्या 6 मजल्यांचे आहे. गौरी खानने घराचा विस्तार करण्याची परवानगी मागितली आहे. 'मन्नत' 2091.38 चौरस मीटरमध्ये बांधले आहे. गौरी खानला हे घर 4 ते 8 मजल्यापर्यंत वाढवायचे आहे. अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो सुजॉय घोषच्या 'किंग' या अॅक्शन चित्रपटात काम करत आहे. त्यांची मुलगी सुहाना खान देखील या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.