ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील खार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी धर्मेंद्र हे मुलगा सनी देओलसोबत घरी परतले. गेल्या आठवड्यात त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. सध्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.