रश्मिका मंदानाची 'कुर्गी' साडी

शुक्रवार, 20 मे 2022 (18:32 IST)
पुष्पा चित्रपट हिट झाला आणि रातोरात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna's coorgi saree look) घराघरांत पोहोचली. या चित्रपटाआधीही तिची लोकप्रियता होतीच.. पण जसा हा चित्रपट आला तशी ती अधिकच प्रसिद्ध झाली. तिच्या फिटनेसपासून ते तिच्या सौंदर्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचीच जबरदस्त चर्चा होऊ लागली. तिच्याबद्दल जाणून घेण्यास तिचे चाहते नेहमीच उत्सूक असतात. आता चाहत्यांना अशीच उत्सूकता तिच्या साडी नेसण्याच्या पद्धतीबाबत वाटते आहे..
 
 रश्मिका आणि तिचं साडी प्रेम तर सगळेच जाणून आहेत. नुकतीच ती पुन्हा एकदा साडीमध्ये दिसून आली. नेहमीप्रमाणे तिची साडी तर छान होतीच, शिवाय रश्मिकाही सुंदर दिसत होती. पण यासगळ्यांपेक्षा जास्त चर्चा आहे, ती साडी नेसण्याच्या तिच्या पद्धतीविषयी म्हणजेच saree draping स्टाईलविषयी. रश्मिका ज्य पद्धतीची साडी नेसली आहे, त्याला कुर्गी Coorgi किंवा कोडवा kodava पद्धत म्हणतात. ज्याप्रमाणे गुजराथी किंवा बंगाली पद्धतीने साडी नेसली जाते किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीने नऊवारी घालतात, तशीच कुर्गी पद्धतीने नेसलेली साडी ही खास कर्नाटकी स्टाईल म्हणून ओळखली जाते.
 
कर्नाटकात कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमांमध्ये, लग्नसोहळे किंवा मग सणावाराला अशा पद्धतीनेच कुर्गी साडी नेसण्यात येते. सध्या आपल्याकडे लग्नसराई सुरू आहेच.. अशावेळी जर इतरांपेक्षा काही वेगळा खास लूक करायचा असेल किंवा स्पेशल दिसायचं असेल, तर तुम्हीही अशा पद्धतीने कुर्गी साडी ट्राय करू शकता. उंच, शिडशिडीत महिलांना अशा पद्धतीने नेसलेली साडी अधिक शोभून दिसते. या प्रकारात साडीचा पदर संपूर्ण दिसतो. त्यामुळे जर तुमच्या साडीचा पदर अधिक भरजरी असेल, तर यंदाच्या लग्नसराईत कुर्गी किंवा कोडवा साडी नक्कीच ट्राय करून बघा..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती