जोधपूर- बॉलीवूड स्टार सलमान खान विरूद्धच्या काळवीट शिकार प्रकरणाची अंतिम सुनावणी एक मार्चपासून सुरू होईल, असे त्याच्या वकिलाने सांगितले आहे. गेल्या 27 तारखेच्या सुनावणीमध्ये सलमान खानने तो निर्दोष असल्याचे सांगितले होते. शिवाय आपण आणखी पुरावेही सादर करू अशी माहिती त्याने न्यायालयासमोर दिली आहे.