या चित्रपटाचे नाव ‘द मदर’ असे असून हा चित्रपट अंजुम रिजवी फिल्म कं, मनोज अधिकारी प्रोडक्शन आणि पगमार्क फिल्म्स प्राइवेट लिमिटेडच्या सहकार्याने सीडीबी संगीतच्या बॅनरखाली प्रस्तुत करण्यात येईल. ‘स्लमडॉग मिलियनेयर’ चित्रपटातील अभिनेता मधुर मित्तल या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.