भारताचा माजी कर्णधार कपिल देव याच्या नेतृत्वखाली भारताने 1983 ला पहिला विश्वचषक जिंकला होता. त्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देवने उंचावलेल्या विश्वचषकाची नोंद भारतीय क्रिकेटाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी झाली. या सामन्यावर आणि विशेषत: कपिलवर साकारलेल्या या सिनेमात कपिल देवची भूमिका कोण साकारणार याची ख़ूप चर्चा होती. आधी अर्जुन कपूरचे नाव पुढे आले होते. पण रणवीरसिंग कपिलची भूमिका साकारणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.