वरूणचा क्वीनला सपोर्ट, पण...

कंगना राणावतने हिंदी चित्रपटसृष्टीत वंशवाद सुरू केल्याच्या आरोपात तथ्य आहे. मात्र कंगनाबाबत बोलतना अनेक बाबी तिखटमीठ लावून सांगितल्या जात आहेत, असे अभिनेता वरूण धवन म्हणाला. करण जोहरच्या कार्यक्रमात बॉलीवूडची क्वीन असलेल्या कंगनाने करणवर वंशवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. कंगनाच्या वक्तव्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ माजली होती.
 
कंगनाच्या आरोपानंतर एका अॅवार्ड शोमध्ये वरूण धवन, सैफ अली खान आणि करण जोहरने तिच्या वक्त्वाची हेटाळणी केली होती. तिघांनीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर तिघांनाही माफी मागावी लागली होती. कंगनाने करणवर केलेल्या आरोपांबाबत बोलताना वरूण म्हणाला, करने आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांना लाँच केले आहे? अभिनेत्यांच्या मुलांनाच ना? हा आरोप नाही मात्र ते एक सत्य आहे.
 
कंगनाने केलेल्या आरोपांमद्ये सत्यता दिसून येते मात्र लोकांकडून मुद्दाम या प्रकरणाला वेगळा रंग दिला जात आहे. लोक याचा आपल्या स्वार्थासाठी फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही वरूण म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती