तारीख आहे 20 नोव्हेंबर आणि स्थळ आहे दीपिकाला आवडणारे शहर इटली. दोघांनी इटलीत विवाह करण्याचे निश्चित केले असून विवाह सोहळ्यात मोजके 30 पाहुणे उपस्थित राहतील अशीही बातमी आहे. अनेकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या असल्या तरी या वेळी फिल्मफेअर या बेवसाईटने या दोघांच्याही लग्नाबाबत वृत्त प्रसारित केले असून त्यावर शुभेच्छाचे ट्वीट येत असल्यामुळे लग्न ठरलं असल्याच बोललं जात आहे.
त्या दोघांनी याबाबत कुणलाही खुलासा केला नसला तरी चर्चा जोरात रंगली आहे. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन ठेवण्यात येईल असे ही सूत्रांनी माहिती दिली आहे. रणवीर-दीपिका 2013 पासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच दोघांनी रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत या सुपरहिट चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहेत.