'मुल्क'मध्ये दिसणार तापसी

रविवार, 29 जुलै 2018 (00:02 IST)
अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'मुल्क' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुल्क' हा चित्रपट कोर्टरुम ड्रामा प्रकारात मोडणारा असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून दहशतवाद, घातपात, हिंदू- मुस्लीम वाद अशा महत्त्वाच्या मुंद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तयार करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्देदेखील विचारात घेण्यात आले होते. या मद्यांच्या सखोल अभ्यास केल्यानंतरच हा चित्रपट साकार झाला आहे. 'मुल्क' या चित्रपटामध्ये तापसी पन्नू आणि ऋषी कपूर हे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून यामध्ये आजच्या काळात समाजामध्ये घडणार्‍या प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जातीधर्मावरून अनेक काळापासून वादविवाद सुरु आहेत. त्यामुळे या परिस्थिती कोणताही बदल होईल असं दिसून येत नाही. त्यामुळे या मुद्याचा आवर्जून या चित्रपटात समावेश करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये अनेक वर्षांपासून सुरु असलेल वादावर प्रकाश टाकण्यात आला असून या संघर्षाचे परिणाम काय होतात ते या चित्रपटामध्ये दर्शविण्यात आलं आहे. कोण हिंदू किंवा कोण मुस्लीम हे महत्त्वाचं नाही. जो व्यक्ती मदतीला धावून येतो त्या व्यक्तीच्या मानवतेचं दर्शन या चित्रपटामध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समोरच्या व्यक्तीमधील चुका शोधण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शोधण्यासाठी प्रेरित करणारा हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे कौटुंबिक स्वरुपाचा आहे, असं अभिनेता रजत कपूर याने सांगितलं. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमधील संबंधावर भाष्य करणार्‍या या चित्रपटामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती