रणबीर पडला नव्या तरुणीच्या प्रेमात ?

गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (10:53 IST)
अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो आपल्या जबरदस्त अभिनाबरोबरच लव्ह अफेअर्समुळेही चर्चेत असतो. आजवर त्याचे नाव अवंतिका मलिक, प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यच्यासारख्या अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. सध्या आलिया भट्टसोबतचे त्याचे नाते चांगलेच गाजत आहे. दरम्यान, आता आणखी एक नवी तरुणी च्याच्या आयुष्यत आल्याची  म्हटले जात आहे. रणबीरच्या या नव्या नात्यावरून सध्या 'बी'टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर नताशा पूनावालासोबत हँगआऊट करताना दिसत आहे.
 
ऑनलाइन ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध असलेली नताशा करिना कपूरची खास मैत्रीण आहे. त्यांची ही वाढती जवळीक अनेकांच्या लक्षात आली असून त्यावरून  चर्चेला उधाण आले आहे. परंतु काही लोकांचे म्हणणे आहे की त्या दोघांमध्ये केवळ चांगली मैत्री आहे. 
 
नताशा ही व्यवसायिक आमदर पूनावाला याची पत्नी आहे. तिचे अनेक सेलिब्रिटींशी चांगले संबंध आहेत. आता दोघांच्या मैत्रीचा रणबीर आणि आलियाच्या प्रेसंबंधांवर कसा परिणाम होतो हे नक्कीच पाहणजोगे ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती