अभिनेत्री राखी सावंतचा एक्स बॉयफ्रेण्ड बोहल्यावर चढणार आहे. राखीसोबत तीन वर्षांच्या रिलेशनशीपनंतर विभक्त झालेला अभिनेता अभिषेक अवस्थी पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे. अभिषेक अंकिता गोस्वामीसोबत पुढच्या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अंकिताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही बातमी जाहीर केली आहे.