रईस आणि काबिल हे बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे रिलीज झाले असून या दोन सिनेमांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. दोन्ही सिनेमे बिग बॅनर असल्याने त्यांच्या कमाईवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र बॉक्स ऑफिसवर पहिल्या दोन दिवशी काबिलपेक्षा रईस वरचढ ठरला आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली तरी रईसने पहिल्या दिवशी 20 कोटींहून अधिक तर दुसऱ्या दिवशी 26.30 कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जात आहे. तर काबिलने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केल्याचे ट्विट चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी केलं आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही रईसनेच बाजी मारल्याचे रिपोर्ट आहे.