तसेच अरमान आणि आशना यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाची सुरुवात केल्याबद्दल चाहते आणि सेलिब्रिटीज त्यांचे अभिनंदन करत आहे. अरमान मलिक आणि आशना श्रॉफ खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 2017 मध्ये दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, काही अडचणींमुळे दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2019 मध्ये अरमान आणि आशना पुन्हा एकदा भेटले आणि तेव्हापासून ते एकत्र आहे. आशना पती अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. तसेच आशना व्यवसायाने YouTuber, ब्लॉगर, सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. ती फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित ब्लॉग तयार करते.