यातच निकने भावुक पोस्ट करत पहिल्या करवा चौथचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.दरम्यान, इन्स्टाग्रामवरील तिच्या पहिल्या करवा चौथच्या फोटोला फॅन्स तसेच बॉलिवूड सेलेब्सकडून चांगलीच पसंती मिळाली आहे.
या पोस्टला कॅप्शनमध्ये निकने लिहिले की,“माझी पत्नी भारतीय आहे आणि ती हिंदू आहे. ती प्रत्येक गोष्टीत बेस्ट आहे. तिनं तिची संस्कृती आणि धर्माविषयी मला अनेक गोष्टी शिकवल्या. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्ही पाहू शकता आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप एंजॉय करतो. करवा चौथच्या सर्वांना खूप शुभेच्छा!’’ असेही लिहीले आहे.
तत्पूर्वी, इटलीमध्ये आपल्या डेटचा एक भाग चक्क कुकिंग क्लास आयोजित केला होता. निकने या डेट नाईटचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये निकने “अजबसी डेट नाईट कुकिंग’ असेही लिहीले होते.