प्रियांका चोप्राच्या बेवॉच या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ म्हणजेच अॅडल्ट सर्टिफिकेट दिलं आहे, तसंच सिनेमातील एकूण पाच दृश्यांवर कात्री चालवल्याचीही माहिती आहे. सिनेमामध्ये प्रियांकाच्या कोणत्याही दृश्याला कात्री लावली नाही. असं स्पष्टीकरण निहलानी यांनी दिलं आहे.
‘बेवॉच’मधील एका दृश्यावर आणि चार संवादांना कात्री लावण्यात आली आहे.‘भारतीय सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शकांनी बिकिनीच्या मुद्द्याला जास्त महत्त्व देणं टाळावं. त्याऐवजी त्यांनी मॉरिशस आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर जावं..’, असा सल्लाही पहलाज निहलानी यांनी दिला आहे.