प्रीतीने साउथ वेस्टर्न कमांडच्या आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (AWWA) ला एकूण 1.10 कोटी रुपये दान केले. हे दान त्यांच्या इंडियन प्रीमियर लीग संघ पंजाब किंग्जच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत देण्यात आले.शनिवारी जयपूरमध्ये लष्कराने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. येथे प्रीतीने सशस्त्र दलांबद्दल आदर आणि प्रशंसा व्यक्त केली.
प्रीती म्हणाली, 'आपल्या सशस्त्र दलांच्या शूर कुटुंबांना पाठिंबा देणे हा सन्मान आणि जबाबदारी दोन्ही आहे. आपल्या सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची परतफेड कधीच खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही. तथापि, आपण त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे राहू शकतो आणि त्यांना पुढे जाण्यास मदत करू शकतो. आम्हाला भारतीय सशस्त्र दलांचा खूप अभिमान आहे आणि आम्ही आमच्या देशाच्या आणि त्याच्या शूर रक्षकांच्या समर्थनार्थ उभे आहोत.