कादर खान यांची प्रकृती नाजूक, संवाद साधणे बंद

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची तब्येत खालवली आहे. ते गंभीर असून कॅनेडा येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांचा मुलगा सरफराज यांनी ही माहिती दिली. 
 
कादर खान 81 वर्षांचे आहेत. त्यांना कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार आहे. सध्या त्यांनी संवाद साधणे बंद केले आहे. काही काळापूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर त्यांना चालता-फिरता देखील येत नाहीये. अनेक वर्ष ते कॅनडाला आपला मुलगा आणि सून यांच्या सोबत राहतायत. त्यांनी पूर्वी रामदेव बाबांच्या आश्रमात देखील उपचार घेतला होता परंतू विशेष फायदा झाला नाही.
 
2015 मध्ये कादर खान दिमाग का दही या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. कादर खान यांनी 300हून अधिक सिनेमांत काम केलंय. अभिनयासकट अनेक चित्रपटांचे लेखन, संवाद, पटकथा लिहिले आहेत. आपल्या विचित्र अंदाजामुळे आणि विनोदी डॉयलॉग्समुळे त्यांचे अनेक चित्रपट हिट झालेत.
 
अनेक चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारली, वयाला वळगता त्यांनी अनेक सिनेमे त्यांनी स्वत:चया बळावर बॉक्स ऑफिसवर हिट केले. 90व्या शतकात गोविंदा आणि कादर खान यांची जोडी तर सुपरहिट होती. काळ बदलला पण कादर खान एव्हरग्रीन ठरले. याशिवाय त्यांनी कुलीमध्ये अमिताभ बच्चनसोबतही काम केलं होतं. तर हिम्मतवाला सिनेमात जितेंद्रबरोबर महत्त्वाची भूमिका साकारली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती