कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (13:28 IST)
कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगनाचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 
 
कंगना तिच्या ट्विटर अकाऊंटवरून वारंवार तिरस्कार, वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सदर याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर कंगनाने पुन्हा एक ट्विट केलं आहे.
 
"मी रोज अखंड भारताबद्दल बोलत आहे. रोज मी तुकडे-तुकडे टोळीशी लढत आहे. तरीही माझ्यावरच देशाचं विभाजन केल्याचा आरोप होत आहे. व्वा! तरीही, माझ्यासाठी ट्विटर हे एकमेव प्लॅटफॉर्म नाही. एका इशाऱ्यात हजारो कॅमेरे माझ्याकडे इंटरव्ह्यू घेण्यासाठी येतील हे सगळ्यांनी लक्षात ठेवा.
 
"माझा आवाज दाबण्यासाठी तुम्हाला मला मारावं लागेल. पण त्यानंतर मी प्रत्येक भारतीयांच्या माध्यमातून बोलेन आणि हेच माझं स्वप्न आहे. तुम्ही काहीही केलं तरी माझं स्वप्न आणि ध्येय साकार होईल. म्हणूनच मला खलनायक आवडतात," असं कंगनानं ट्वीट केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती