अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील डॉक्युसीरीज, ‘सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’ मध्ये दिसणार महाराष्ट्राचा मुलगा, निलेश साळुंखे!
महाराष्ट्राचा मुलगा, निलेश साळुंखे सांगतोय त्याचा कबड्डीपटू होण्याचा प्रवास, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या आगामी डॉक्युसीरीजमध्येअभिषेक बच्चन याच्या मालकीची जयपूर पिंक पँथर्सवरील सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स या डॉक्युसीरीजचा प्रीमियर 4 डिसेंबर पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या अॅमेझॉन ओरिजिनल डॉक्युसीरीजमध्ये छोट्याशा शहरातील कबड्डीपटूंचा आजवरचा प्रवास आणि त्यांचे या खेळाचे स्वप्न साकार करण्यातील त्याग आणि त्यातील उत्कटतेच्या भावनेची साक्ष देते.
महाराष्ट्राचा एक प्रामाणिक कबड्डीपटू आणि रेडर निलेश साळुंखे, त्याचे देखील आयुष्य या खेळाने कसे बदलले त्याविषयी सांगतो, तो म्हणतो, "मी अगदी शून्यापासून सुरुवात केली आहे, माझ्याकडे राहण्यासाठी योग्य घर नव्हते, मी आणि माझे कुटुंब राहत होतो ते अगदी लहान घर होते. आज मी जिथे आहे तिथे पोचणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, मला खूप संघर्ष केला आहे. प्रशिक्षकांनी मला साथ दिली आहे, योग्य आहार घेण्यासाठी देखील माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते, ज्यासाठी माझ्या प्रशिक्षकांनी मला मदत केली. माझा महिंद्रा आणि महिंद्रा, आणि एअर इंडिया यांच्यासोबत करार होता. मी महा कबड्डी देखील खेळलो जिथे मी अनेक उत्कृष्ट पारितोषिके मिळवली आहेत."
तो पुढे म्हणाला की, "प्रो कबड्डीमध्ये आल्यानंतर मी नवीन घर विकत घेतले. मी इतर संघात असताना मला नेहमी जयपूर पिंक पँथर्सकडून खेळण्याची इच्छा होती आणि मला मागच्या वर्षी ही संधी मिळाली. मी चार वेळा नॅशनल खेळलो आहे आणि मला जेपीपीकडून खेळणे सुरू ठेवण्याची इच्छा आहे. माझा या मालिकेतील प्रवास यामध्ये बघायला मिळेल."